सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधींनी डागली तोफ

rahul gandhi narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून चिंतेची बाब कायम आहे. त्यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची कमतरता देखील कायम असून सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी डागली तोफ डागली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं पंतप्रधान मोदींनी विजय घोषित केला, करोनाला हरवलं असल्याचं म्हटलं. अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.

कोरोना या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितलं. त्यामध्ये लस घेणे हा कायमस्वरुपीचा उपाय आहे. लॉकडाऊन हेही हत्यार आहे, पण यामुळे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन हे तात्पूरते उपाय असून लसीकरण हाच सर्वात प्रभावशाली आणि कायमस्वरुपीचा उपाय असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.