हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 2 महिने उलटूनही यावर तोडगा निघालेला नसून देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारला जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत” असा हल्लाबोल राहुल यांनी केला आहे.
कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी दिला आहे. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांची चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे. उद्योजकांची नाही” असं राहुल गांधी यांनी म्हटलं
The three options PM Modi has offered to India:
1. Hunger
2. Unemployment
3. Suicide pic.twitter.com/kS3IFZoWye— Congress (@INCIndia) February 13, 2021
हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. “अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’