हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हातपाय पसरल्यानंतर चिंता वाढली आहे. कोरोनाचा आटोक्यात आणताना मोदी सरकार अपयश आले असून काँग्रेस नेते राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस रोगाशी लढायला देखील मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगतील अस राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे फक्त भारतामध्येच करोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी उद्याला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील
मोदी सिस्टम के कुशासन के चलते सिर्फ़ भारत में कोरोना के साथ-साथ ब्लैक फ़ंगस महामारी है। वैक्सीन की कमी तो है ही, इस नयी महामारी की दवा की भी भारी कमी है।
इससे जूझने के लिए PM ताली-थाली बजाने की घोषणा करते ही होंगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2021
दरम्यान, राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करत असतात. यापूर्वी राहुल गांधी म्हणाले होते, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि करोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.