हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. ‘ही तर जनतेची लूट’ अस म्हणत राहुल गांधींनी हा केवळ ‘दोन लोकांचा विकास’ असल्याचंही म्हटलंय.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईकरांना गॅस सिलिंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत.
जनता से लूट,
सिर्फ़ ‘दो’ का विकास।#LPGPriceHike pic.twitter.com/GHdNcQJFYq— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 15, 2021
दरम्यान गॅस सिलिंडर च्या वाढत्या किमती सर्वसामान्य माणसासाठी चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२० नंतर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर एका सिलिंडरची किंमत ६९४ वरून ७१९ वर पोहचली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’