राहुल गांधींनी मारले 9 सेकंदात 13 पुशअप्स ; दाखवला आपला फिटनेसचा दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. एका शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ मध्ये राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारताना ते दिसत आहेत. त्यानंतर या विद्यार्थ्यीनीने त्यांना एका हाताने पुशअप्स मारायला सांगितले. राहुल यांनी या विद्यार्थीनीची ही इच्छाही पूर्ण करत एका हाताने पुशअप्स मारले.

 

दरम्यान, राहुल गांधी यांनी दक्षिणेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ते वारंवार दौरा करत आहेत. पुद्दुचेरी , केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही त्यांनी केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like