स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाका

0
54
Kiran Mane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकारण देखील तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा तर भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.

किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. असे सचिन सावंत म्हणाले.

पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here