हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. कारण महाराष्ट्रात याआधिच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते संचिन सावंत यांनी फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रात ही हेरगिरी आणि फोन टॅपिंग झालं का? याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या pic.twitter.com/0yux7h4PHp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 19, 2021
DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे,” असं संचिन सावंत यांनी म्हटलं आहे.