हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीचा पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सादर करत मोदी सरकार वर गंभीर आरोप करत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप हा विकृत मानसिकतेचा पक्ष आहे असं सचिन सावंत यांनी म्हंटल.
‘भाजपा सारख्या विकृत मानसिकतेच्या पक्षालाच अशा मानवतेसाठी भीषण संकटात राजकारण सुचू शकते. सत्तेचा हव्यास मानसिक विकृतीत कसा बदलू शकतो हे भाजपा नेत्यांच्या रुपाने दिसत आहे. महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय होत असताना हा भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’ असा घणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.
भाजपा सारख्या विकृत मानसिकतेच्या पक्षालाच अशा मानवतेसाठी भीषण संकटात राजकारण सुचू शकते. सत्तेचा हव्यास मानसिक विकृतीत कसा बदलू शकतो हे भाजपा नेत्यांच्या रुपाने दिसत आहे. महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय होत असताना हा भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका! https://t.co/snitVSvYDW
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 11, 2021
पृथ्वीराज चव्हाण यांनी नक्की काय आरोप केला-
केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार १००० रुग्णांमागे गुजरातला १३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहे तर महाराष्ट्राला केवळ दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेशला एक हजार रुग्णांमागे सात व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असतांना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page