पंढरपूरची पोटनिवडणूक थांबवा, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार : अभिजीत बिचुकलेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे पोटनिवडणूक प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला करणार आहे. आणि ती जर मान्य केली नाही तर बारा एप्रिल रोजी आंदोलन करू असा इशारा देणार असल्याची माहिती ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी दिली.

निवडणूक रद्द करण्याची मागणी का करत आहात, अशी विचारणा बिचुकले यांच्याकडे केली असता सभेसाठी येणारे विविध भागातील नेत्यांमुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोना वाढत असल्याचे बिचुकलेंनी सांगितले. अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो.

विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना तिकीट दिलं आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

You might also like