हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झाले. सुशांतच्या आत्महत्या नंतर राज्यात राजकीय वातावरण गरम झालं होतं तसेच काही लोकांनी सरकार वर निशाणा साधला होता. परंतु सीबीआय, एनसीबी ने अनेक प्रकारचे तपास करून देखील सुशांतचा मृत्यू ही हत्या होती की आत्महत्या हे अजून समजलं नाही. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रशांची सरबत्ती केली आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे,” असं ट्विट करत सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला.
सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 14, 2021
जर अँटेलीया कट रचणारे वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का? परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?” असा सवालही सचिन सावंत यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.