हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने कहर केला असून आता मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान या परिस्थितीत देखील लसीकरणावरून ठाकरे सरकार आणि भाजप यांच्या कडून राजकारण केलं जातं आहे. केंद्राकडून महाराष्ट्रचा नेहमीच दुजाभाव केला जातो असा आरोप सातत्याने ठाकरे सरकार कडून केला जातो. अशातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या 13 कोटी लोकसंख्येला 2 कोटी लसी तर गुजरातच्या 6.50 कोटी लोकसंख्येला 1.62 कोटी लसी का?, तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या असं कसं म्हणता? मोदीकृपा गुजरातवर अधिक का बरसते?, फडणवीसांचा स्ट्राइक रेट हा शब्द फार आवडीचा असल्याने लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
मोदींच्या राज्यात लसीकरणाच्या वाटपामध्येही गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा व देशात सर्वाधिक कसा याचे उत्तर @Dev_Fadnavis यांनी द्यावे. pic.twitter.com/2dLJReVl4J
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 21, 2021
दरम्यान, खरंतर महाराष्ट्राला अधिक लसी मिळवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण त्याऐवजी केंद्र सरकारने दिलेल्या अपुऱ्या लसींचे ते समर्थन करत आहेत हे दुर्दैव असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे