गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच! काँग्रेसचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टोपेंना प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये अस म्हंटल. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून प्रकाश जावडेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय मंत्री ‘युजलेस’ जावडेकर वॅक्सिन वेस्टेज रेटबद्दल खोटी माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचा वॅक्सिन वेस्टेज रेट राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ३% आहे. गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच! अस ट्विट काँग्रेसने केलं आहे.

नक्की काय म्हणले जावडेकर –

महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये. आजच्या तारखेपर्यंत 1 कोटी 6 लाख19 हजार 190 लसी महाराष्ट्राला पोहोचल्या. यातील 90 लाख 53 हजार 523 लसी वापरण्यात आल्या. 6 टक्के लस फुकट गेली. 7 लाख 43 हजार 280 लस पाईपलाईनमध्ये आहे. साधारण 23 लाख लस उपलब्ध असल्याच आकडेवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment