हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने मध्यंतरी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणत वाढ केली. त्यामुळे जनतेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने केलेल्या दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. मोदी सरकारकडून या देशाला बरबाद करण्याचा अजेंडा राबविला जात आहे. त्या विरोधात दि. 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलने करणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्व सामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
LIVE: प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांची पत्रकार परिषद #JanJagranAbhiyan https://t.co/HHqIriAMD4
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 10, 2021
महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेच्यावतीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे जनजागरण अभियान राबविण्याचा. जन जागरण अभियान म्हणून देश वाचवण्याचे आवाहन आहे. महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
जन जागरण अभियान म्हणजे देश वाचवण्याचे आवाहन.
महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे.
आपणही या, आमच्या जन जागरण अभियानाशी जोडले जा आणि देश वाचवा.#JanJagranAbhiyan pic.twitter.com/i0A0Cqkb6i
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 10, 2021