महाराष्ट्रात आग लावण्याचा भाजपमधील नेत्यांकडून धंदा सुरु ; नाना पटोले यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व त्यातील नेत्यांवर घणाघाती टीका केली. अमरावती सध्या शांत झाली आहे. अशात आता भाजपकडून येथील परिस्थिती बिघडवत आहेत. महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा भाजपमधील काही नेत्यांनी सुरु केला आहे. तो बंद करावा. या पक्षातील नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पटोले यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपकडून जाणीवपूर्वज जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? भाजप नेत्यांचे सत्ता गेल्यापासून वागणे विरोधी पक्षासारखे नसून उलट महाराष्ट्र विरोधी पक्षासारखे असल्याचे पटोले यांनी म्हंटले.

राज्यातील नांदेडसह अनेक ठिकाणी हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये मालेगाव व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे. परंतु भाजपकडून येथील परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Leave a Comment