देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न केल्यास… ;पटोलेंचा मोदींना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला. “देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. पुढे अशा प्रकारचा प्रयत्न केल्यास काँग्रेस तो हाणून पाडेल,” असे पटोलेंनी म्हंटले आहे.

यावेळी पटोले म्हणाले की, “स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी आहे. भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात हुकुमशाही सत्ता सुरू झाली. परंतु, जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकीक आहे. भाजपा त्याला तिलांजली देण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी व भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. जातीय तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे.

काल स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाच्या निमिताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मोदींच्या निर्णयानंतर त्यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान भरत-पाकिस्तानच्या फाळणीच्या व मोदींनी घेतलेल्या स्मृतिदिनाचा मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी पटोले यांनी देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचण्याचे भाजपकडून केकला जात असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.

Leave a Comment