किरीट सोमय्यांच्या आरोपांना घाबरत नाही, गुन्हा दाखल करणार – नाना पटोलेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणावरून गंभीर आरोप केले जात आहेत. सोमय्या यांनी आज बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गैर व्यवहार झाला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग केल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या आरोपनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हंटले आहार.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आरोप करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी आम्हाला त्यांच्या आरोपामुळे काहीही फरक पडत नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. उद्या काँग्रेस सोमय्यावर गुन्हे दाखल करणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गैर व्यवहार प्रकरण गंभीर असल्याचे सांगत यामागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून आता त्यानंतर सोमय्या यांनी थेट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे नाव घेत त्यांनी या प्रकरणी माहिती द्यावी, अशी मागणी केली असल्याने याबाबात काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

Leave a Comment