हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधानसभा अध्यक्ष निवडीबद्दल महाविकास आघाडीत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा केली जात होती. या अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसचे नेते राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत विधान सभेचा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार आहे, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत माहिती दिली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवड ६ जुलै रोजी होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. आमच्या पक्षातील आमदारांसाठी आज व्हीप निघतील. आम्ही गेली दीड वर्षे कारभार चालवत आहोत. आमच्या तिन्ही आघाडीत एकमत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय हा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घेतला जाणार आहे आणि तो काँग्रेसचाच अध्यक्ष होईल.
यावेळी मंत्री थोरात म्हणाले कि, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांनी शेतकऱ्यांना फटकाच बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्वताचा आसा कृषी कायदा आणणार आहे. त्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात प्रयत्नही करणार आहे. शेतकऱयांच्या हितासाठी हा कायदा असणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेने यापूर्वीच आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. त्यानंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादीकडूनही आपापल्या पक्षातील आमदारांना व्हिप जारी केले जात आहेत. येणाऱ्या ६ जुलै रोजी विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती आज मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.