काँग्रेसचे You Tube चॅनेल डिलीट; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस पक्षाचे यु ट्यूब चॅनेल इंडियन नॅशनल काँग्रेस सोशल मीडिया साइट यूट्यूब वरून डिलीट करण्यात आले आहे. देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामागे कोणत्या कटाचा भाग आहे की काही तांत्रिक कारण आहे याचा तपास सुरू असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षानेच आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली, काँग्रेस सोशल मीडिया टीमने सांगितले की आमचे यूट्यूब चॅनल ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ डिलीट करण्यात आले आहे. आम्ही याचे निराकरण करण्यासाठी काम करत आहोत आणि Google आणि YouTube टीमच्या सतत संपर्कात आहोत. यामागचे कारण तांत्रिक बिघाड आहे कि वेगळंच काही आहे याचाही तपास सुरू असून लवकरच चॅनेल पुन्हा सुरु होईल अशी आशा आहे असे काँग्रेसने म्हंटल.

महत्त्वाचे म्हणजे मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी देशविरोधी अफवा पसरविणारे युट्यूब चॅनेल बंद केले होते. त्यातच आज काँग्रेसचे युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने बॅन केलेल्या चॅनेल मध्ये काँग्रेसचा समावेश नव्हता हे विशेष.