Dear बायको म्हणत कुणाल राऊतांची खास पोस्ट; तू फक्त Wife नाहीस तर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयानंतर त्यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुणाल राऊत यांनी आपल्या पत्नी सोबतचा एक फोटो शेअर करत तू फक्त माझी बायको नाही तर माझं जीवन आहेस अस म्हंटल आहे. कुणाल राऊत यांच्या या पोस्ट वर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कुणाल राऊत आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, प्रिय बायको, तू फक्त माझी जोडीदार नाहीस, तू माझी प्रेयसी आहेस. तू फक्त माझी सोबती नाहीस, तू माझी प्रेरणा आहेस. तू नेहमीच माझी शक्ती आहेस तू फक्त माझी पत्नी नाहीस, तू माझे जीवन आहेस. इतके समर्थन, प्रेमळ आणि काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद बायको तुझ्यावर खूप प्रेम आहे???? अस कुणाल राऊत यांनी म्हंटल. तसेच यावेळी त्यांनी #Myladyluck असे हॅश टॅग देखील वापरले.

दरम्यान, नुकतंच पार पडलेल्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडणूकीत कुणाल राऊत यांनी दमदार विजय मिळवला. अनेक दिग्गजांना मागे टाकत कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली आहेत. आपल्या विजयानंतर कुणाल राऊत यांनी काँग्रेसचे वरीष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्र पदाधिकारी यांचे आभार मानत भविष्यात काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहीन असे म्हंटल आहे.

Leave a Comment