हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून सुरू झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज दोन महिने पूर्ण होत आहेत. ही काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. शेगावमध्ये 10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत.
या भरत जोडो यात्रेचे तेलंगणाच्या सीमेवरील देगलूर शहरात सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश आणि नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल.
यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. या यात्रेला पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी नांदेडमधील सभेमध्ये ते सहभागी होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.