खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला, ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या बेवसाईटवर त्यांची ओळख वाईट शब्दात करण्यात आल्याचे स्क्रीनशॉट समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबधितावर कारवाईचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असा इशारा अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे.

माहितीनुसार (Raver) रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment