‘त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..’; ‘या’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

mla gyandev ahuja
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भाजप नेते ज्ञानदेव आहुजा (mla gyandev ahuja) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते (mla gyandev ahuja) ‘आम्ही तर यांच्या पाच लोकांना मारलं आहे, पण पहिल्यांदाच या लोकांनी आमच्या एका व्यक्तीची हत्या केली आहे’ असे म्हणताना दिसत आहेत. तसेच मी (mla gyandev ahuja) माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण सूट दिली आहे. मी त्यांना जामीन मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं आहे असेदेखील म्हणाले. आहुजा (mla gyandev ahuja) यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतसरा यांनी आहुजांचा (mla gyandev ahuja) हा व्हिडिओ ट्विट करून लिहिले कि ‘भाजप किती जातीयवादी आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओशिवाय दुसरं काही दाखवण्याची गरज नाही. पश्चिम बंगालमधील टीएमसी नेते आणि खासदार महुआ मोईत्रा यांनीदेखील ज्ञानदेव आहुजा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

यापूर्वी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर आहुजा (mla gyandev ahuja) मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. बडोदामेव पोलीस स्टेशन हद्दीतील मीनाबास येथे एका 8 वर्षीय तरुणीला दुचाकीने धडक दिल्याने लोकांनी दुचाकीस्वार युवक योगेश जाटव याला बेदम मारहाण केली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आहुजा यांचे वक्तव्य समोर आले होते.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?