व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…. ‘या’ लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वादग्रस्त वक्तव्य सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. अकोला येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. दरम्यान, त्यांच्या या विधानांने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. मात्र त्यांच्यामुळेच मी सतत अडचणीत आलो आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील,’ असं इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून साथही दिली.

दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी यापूर्वीही अनेकदा काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती.