सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून कॉपरचे साहित्य चोरी करून त्यातील तांबे काढून विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. या प्रकरणी पोलिसांनी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १०१ किलो वजनाचे कॉपर असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दत्तात्रय वसंत माने, करण अजित गोसावी आणि श्रीनिवास रमेश पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी चाणक्य चौक येथे सापळा लावला. त्यावेळी सुतगिरणी चौकाकडुन मारुती ८०० त्याच्या पाठोपाठ एक छोटा टेम्पो येत असताना दिसला. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना थांबवून गाड्यांची तपासणी केली असता मागील तांब्याच्या वायरी आणि तारा भरलेले दोन पोते मिळाले. टेम्पोच्या हौदा मध्ये तांब्याच्या वायरी आणि तारा भरलेली दोन पोती मिळाली.
त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सागितले कि, आम्ही सर्वानी मिळुन रात्रीच्या वेळी दिघंची चौकातुन पंढरपुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडुन चोरी केली. तसेच अलकुड एस गावच्या हद्दीतील एका फॅक्ट्रीमधील ट्रान्सफॉर्मर व पॅनल बोर्ड चोरी केला, पुणदी फाटा येथील नवीन बांधलेल्या पंप हाऊस मधुन चोरी केली, तसेच दुधगाव येथील वारणा घाट येथुन ट्रान्सफॉर्म मधून तांब्याच्या तारा व तांब्याच्या प्लेटा चोरल्याचे सांगितले. मारुती कार मधील १०१ किलो वजनाच्या १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा, टेम्पो मधील ६९ किलो वजनाच्या ६९ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आणि चोरीत वापरलेल्या दोन्ही गाड्या असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.