हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विट करत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारकडून कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक लागण झालेले रुग्ण असल्याचे गेल्या काही सलग दिवसांपासून दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
कॉरोना मृतांची नोंद, ठाकरे सरकारची लपवाछपवी
1 ते 13 एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार 309 झाले असल्याची नोंद आहे pic.twitter.com/k1gbDku0So
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 15, 2021
१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करू, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ठाण्यात स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ करोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, असा दावाही सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमधून केला आहे.