कोथिंबीर म्हणजे आरोग्याचा खजाना; ‘हे’ 6 फायदे पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोजच्या जेवणात कोथिंबीरचा (Coriander) वापर आपण करतोच. जेवण अधिक रुचकर आणि चविष्ट बनण्यासाठी जवळपास सर्वच जण सर्रासपणे कोथिंबीर वापरतात. परंतु कोथिंबीर फक्तच चवच वाढवत नाही तर याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतात. चला आज आपण जाणून घेऊया कोथिंबीर खाण्याचे जबरदस्त फायदे….

1) पोटाच्या समस्या दूर होतात –

कोथिंबीर खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनशक्ती सुद्धा वाढते. खास करून ताजी कोथिंबीर ताकात मिसळून प्यायल्याने अपचन, मळमळ, आमांश आणि कोलायटिसमध्ये आराम मिळतो. तसेच गॅसच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

2) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते-

कोथिंबीर हे व्हिटॅमिन ए आणि सी चे मुख्य स्त्रोत आहे. कोथिंबीरच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कोथिंबिरीच्या आत अँटीऑक्सिडंट असतात. ते फ्री रॅडिकल्समुळे होणारे सेल्युलर नुकसान टाळतात.

3) मधुमेहींसाठी उपयुक्त –

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कोथिंबीर खूप उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीर रामबाण उपाय मानला जातो. याच्या नियमित सेवनाने रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.

4) हृदयविकारापासून बचाव-

हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णानी सुद्धा कोथिंबीर खावी. कोथिंबीर खाल्ल्याने शरीरातील अनावश्यक अतिरिक्त सोडियम लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीर आतून तंदुरुस्त राहते.

5) कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात येते-

कोथिंबीरमध्ये असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि नियंत्रणात ठेवतात. कोथिंबीर मध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक आढळतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्तीने कोथिंबीर उकळून त्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.

6) महिलांची मासिक पाळीची समस्या दूर –

कोथिंबीरमुळे महिलांची मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते. जर मासिक पाळी सामान्य पेक्षा जास्त असल्यास, सुमारे 6 ग्रॅम धणे अर्धा लिटर पाण्यात उकळवा. या पाण्यात साखर घालून प्यायल्यास फायदा होईल.