औरंगाबाद – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पळवून लावण्यात काल औरंगाबादकरांना यश आले. दिवसभरात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. काल दिवसभरात 194 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मागील दोन वर्षांमध्ये शुन्य रुग्ण संख्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात आता सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 48 आहे.
15 एप्रिल रोजी कोरोनाला औरंगाबादेत दोन वर्षे पूर्ण होतील. मागेल तिने लाटांमध्ये शुन्य रुग्ण संख्या कधीच झाली नव्हती. कोरोना प्रतिबंध लसीकरणाला 16 जानेवारी 2021 मध्ये सुरुवात करण्यात आली. सव्वा वर्ष उलटले तरी औरंगाबाद जिल्ह्यात 90 टक्के लसीकरण झाले नाही. राज्यशासनाने लसीकरण जास्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे निर्बंध उठवले. औरंगाबादेत 90 टक्के लसीकरण न झाल्यामुळे 50 टक्क्यांचे निर्बंध कायम आहेत.
कोरोनाची तिसरी लाट जानेवारी 2022 मध्ये आली. रुग्णांना कोणताही त्रास नव्हता कोरोनाची लक्षणे ही नव्हती. बहुतांश रुग्णांनी दोन डोस घेतले होते. महापालिकेने ऑक्सिजन आणि बेडची संख्या वाढून ठेवली होती. सुदैवाने त्याची गरजच पडली नाही.