महाराष्ट्राला काहीसा दिलासा! कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट झाली असून 39923 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणता येईल. तसेच राज्यात आज 695 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.

आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज राज्यात 53,249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 695 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 53,09,215 झालीय. तर राज्यात आज एकूण 5,19,254 सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.सध्या राज्यातील मृत्युदर हा 1.5 टक्के एवढा आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like