कोरोनाचा कहर !! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. विदर्भात नागपूर यवतमाळ आणि अमरावती मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे.

सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

“स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment