हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारी (Corona) पासून आता कुठे सुटका झाली असं वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचे संकट पुन्हा एकदा जगावर ओढवलेलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएन्टचे नाव EG.5.1 असं असून तो ओमिक्रोनपासूनच तयार झाला असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या या नव्या व्हेरिएन्टने ब्रिटन मध्ये अक्षरशा धुमाकूळ घातला असून EG.5.1 व्हेरियन्टचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हंटल आहे.
आशियामध्ये वाढत्या कोरोना केसेसमुळे देशात कोरोना आल्याचे ब्रिटनने म्हंटल आहे. ३१ जुलै ला EG.5.1 ला कोरोनाच्या व्हेरियन्ट मध्ये वर्गीकृत करण्यात आलं. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हंटल कि, लोक लस आणि पूर्वीच्या संसर्गाद्वारे अधिक चांगले संरक्षित आहेत, परंतु देशांनी त्यांची काळजी घेणं कमी करू नये. कोरोनाचा हा नवा व्हेरिएन्ट जास्त धोकादायक ठरण्याची शक्यता नाही कारण सध्या ब्रिटनमध्ये 14.6 टक्के कोरोना केसेस आहेत. UKHSA च्या ‘रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम’ द्वारे नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4% प्रकरणे कोरोनाची म्हणून नोंदवले गेले.
UKHSA च्या लसीकरण प्रमुख डॉ मेरी रॅमसे यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, आम्ही प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. गेल्या आठवड्याभरात कोरोनाची जी काही प्रकरणे समोर आली त्यामध्ये वृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त होते. वृद्ध रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.मात्र रुग्णसंख्या ही खूपच वाढली आहे असं म्हणता येत नाही तसेच सध्या आयसीयूमध्ये रुग्णांना दाखल होण्याची शक्यता सुद्धा दिसत नाही असे त्यांनी म्हंटल.