सांगली जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट ः नवे विक्रमी २ हजार ३२८ रुग्ण, तर ३८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना गुरुवारी रुग्णांचा महाविस्फोट झाला. एक दिवसात विक्रमी 2 हजार 328 रुग्ण आढळून आले. तर 38 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 134 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे जिकीरीचे बनले आहे. बेडपासून ऑक्सिजन मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 314 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 208, कडेगाव 215, खानापूर 243, पलूस 119, तासगाव 258, जत 256, कवठेमहांकाळ 155, मिरज 307, शिराळा 66 आणि वाळवा तालुक्यात 187 रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याचे तपासणीतून दिसून येते. बेडपासून ऑक्सिजन मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 7 हजार 574 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 3153 पैकी 1214 बाधित तर 4421 अँन्टीजेन चाचणीमध्ये 1192 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 2328 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 38 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 2 आणि मिरज शहर 9, कुपवाड 1, वाळवा तालुका 6, तासगाव व जत तालुक्यात प्रत्येकी 4, खानापूर, पलूस व मिरज तालुक्यात प्रत्येकी 3, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1134 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ सुरुच असून नव्याने 314 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 175 तर मिरज शहरात 139 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 208, कडेगाव 215, खानापूर 243, पलूस 119, तासगाव 258, जत 256, कवठेमहांकाळ 155, मिरज 307, शिराळा 66 आणि वाळवा तालुक्यात 187 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 26, सोलापूर 15, कर्नाटक 27, सातारा जिल्ह्यातील 10 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 85 हजार 647 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 511 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 67 हजार 234 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार 666 कोरोना बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment