सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 778 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 2 हजार 379 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्याची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती दिलासादायक अशी असल्याचे पहायला मिळाले आहे. तर मृत्यूचे प्रमाणही पन्नाशीच्या घरातून चाळीशीच्या खाली आलेले आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 284 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 36 हजार 775 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 10 हजार 283 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3142 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गुरूवारी दिवसभरात 37 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba