केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. आजच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकाश जावडेकर यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विट करत म्हटलं, “माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी.” यापूर्वीही केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांनी कोरोनावर मात सुद्धा केली.

केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूची ही दुसरी लाट खूपच भयावह असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. कारण, अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. तर कुठे वैद्यकीय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

You might also like