Corona JN.1 Variant । देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट मुळे (Corona New Variant) खळबळ उडाली आहे. JN.1 असे या नव्या कोरोना व्हेरिएन्टचे नाव असून याचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. काल एकाच दिवशी देशभरात 600 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. देश आत्ता कुठे रुळावर येत असताना पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याने भीतीदायक चित्र समोर येत आहे.
मागील 24 तासांत भारतात JN.1 व्हेरियेण्टचे (Corona JN.1 Variant) तब्बल 628 नवे रुग्ण सापडले आहेत. यामागील सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 4054 झाली आहे. कर्नाटक राज्यात या व्हेरियेण्टचा सर्वाधिक प्रसार पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी एकाच दिवशी 74 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कर्नाटकातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 464 इतकी असून आतापर्यंत 9 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे जनतेला वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून करा हे उपाय – Corona JN.1 Variant
१) वेळोवेळी साबणाने हात धुवा तसेच कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर सॅनिटायझर वापरा.
२) शक्यतो घरातून बाहेर जाताना मास्क लावा, जेणेकरून व्हायरस तुम्हाला हवेतून संक्रमित करू शकत नाही.
३) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. लग्न समारंभ, कार्यक्रम याठिकाणी अंतर ठेऊन उभं रहा
४) एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्या संपर्कात येणे टाळा. तसेच चुकून जरी तुम्ही संपर्कात आला असल्यास तातडीने कोरोना चाचणी करा.
५) तुम्हाला कोरोनाची लागण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा. घरीच थांबा