कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार दर गुरुवारी होणारा आठवडी बाजार आणि खाटीक व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेव यात्रा हि दरवर्षी गुढीपाडव्यापासुन पाच दिवस चालते हीदेखील शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली आल्याची माहिती टोपच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आ र. देवकाते यांनी दिली.
सध्या संपूर्ण जगाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. कारण कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी याचा फैलाव जास्त होतो. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्या लेखी व तोंडी आदेश सर्वच ग्रामपंचायतीना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार टोप ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात कोरोना प्रतिबंध उपाय याबाबत जनजागृती करण्याचे सुरु आहे.
तसेच टोप कासारवाडी रोडला असणाऱ्या श्री साई मंदिर येथील दर गुरुवारी असणारा महाप्रसाद हि रद्द झाल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरस फैलावु नये यासाठी ग्रामपंचायत टोपच्यावतीने विशेष जनजागृती मोहिम राबविली आहे. अशी माहीती परीपत्रकाद्वारे दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.