हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचे संकट अजूनही काही जाता जाईना, 2020 ला आलेल्या कोरोनाचे एकामागून एक व्हेरिएन्ट अजूनही सुरूच आहेत. त्यातच आता कोरोनाचा महाभयंकर व्हेरिएन्ट XBB.1.5 हा इतर व्हेरिएन्ट पेक्षा अधिक चिंता वाढवत आहेत. याचे कारण म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा याची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण केसेस पैकी 40 टक्क्यांहून अधिक प्रकरणे ओमिक्रॉन XBB.1.5 व्हेरिएन्ट मुळेच आहेत.
INSACOG च्या रिपोर्टनुसार कोरोनाचा हा महाभयंकर विषाणू भारतात सुद्धा पसरला आहे. गेल्या काही दिवसांत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ओमिक्रॉन XBB.1.5 व्हेरिएन्टची सुमारे 26 प्रकरणे आढळून आली आहेत. XXB.1.5 व्हेरियंट हा जुन्या XBB व्हेरियंट पेक्षा खूप वेगाने पसरतो . याची प्रमुख लक्षणे म्हणजे शिंका येणे, नाक गळणे , घसा खवखवणे, ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे, खोकला आणि कर्कश आवाज येणे ही आहेत.
XBB.1.5 व्हेरिएन्ट नेमका का आहे धोकादायक –
तज्ज्ञांच्या मते, XBB.1.5 व्हेरिएन्ट धोकादायक असण्याचे मुख्य कारण म्हणजे हा व्हेरिएन्ट अगदी जलद पद्धतीने पसरतो आणि रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर सुद्धा मात करू शकतो.
हा व्हेरिएन्ट मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करून माणसाच्या शरीरावर अत्यंत वेगवान पद्धतीने आघात करू शकतो.
जुन्या वुहान 1.0 किंवा ओमिक्रॉनवर प्रभावी असलेल्या लसी सुद्धा XBB.1.5 व्हेरिएन्टवर उपयुक्त ठरतील का यावर सुद्धा शंकाच आहे.