राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज नवीन २३ करोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सांगली १, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाणा२, मुंबई १०, ठाणे १ आणि नागपूर २ नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ८९१ वर पोहोचला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सुद्धा चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या शेवटच्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ३५४ रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर पोहोचली आहे. यामधील ३२५ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. मृतांची संख्या ११४ झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांत हा वेग असाच कायम राहिला तर भारतावरील कोरोनाचं आणखी गहिरं होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

शहरांपासून कोसो दूर जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कोरोनाचा काय परिणाम होतोय?

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार