सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता पर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 12 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 9.45 टक्के झाला असून एकूण बाधितांची संख्या ही 101 इतकी झाली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 12 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्याचा सध्या पॉझिटीव्ह रेट हा 9.45 टक्के इतका झाला असून जिल्ह्यात गेल्या 12 तासात 127 रूग्णांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 12 रूग्ण बाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे केवळ 12 रूग्ण उपचार घेत आहेत. तर आज 4 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे.
कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे सहा महिने नागरिक तसेच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडलेला. मात्र, आताच्या एप्रिल म्हणण्यास सुरुवात होताच पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असल्यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.