कोरोना रुग्णांवर आता घरच्या घरी उपचार; जाणून घ्या सरकारची नियमावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत सरकारने एक नियमावलीही सादर केली आहे.

राज्यात अनलॉक सुरु झाला आणि सरकारने अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. रुग्णांवर होणार खर्च जास्त असल्याने आणि रुग्णालयांत बेड्सची उपलब्धताही कमी असल्याने आता सरकारने कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश काढले आहेत.

यानुसार कोरोनाग्रस्तांचा वर्गीकरण करण्यात आले आहे. सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेले, माध्यम तीव्र लक्षणे आणि तीव्र लक्षणे असलेले असं वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच खालील नियमांचे रुग्णांना पालन करावे लागणार आहे

– उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल प्रमाणित केलेले असावे.
– रुग्णाच्या घरी अलगीकरणासाठी योग्य सोई उपलब्ध असाव्यात.
– घरी दिवस रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी.
– काळजी वाहू व्यक्ती आणि उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था उपलब्ध असावी.
– वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मात्र घ्यावी.
– मोबाईलवर आरोग्य सेतू अप्लिकेशन डाउनलोड करावं.
– रुग्णांनी नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुरावा विषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे.
– रुग्णाने स्वतः गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्रक भरून द्यावे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
– १७ दिवसांनंतर रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याला गृह विलगीकरणातून मुक्त करावं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.