राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; तब्बल १५,८१७ नव्या रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर प्रचंड प्रमाणात वाढला असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आता कोरोना रुग्णसंख्येने उच्चाक गाठला असून तब्बल 15817 रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात आज 56 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय.

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22,82,191 झाली. तर राज्यातील २१ लाख १७ हजार ७४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ५२ हजार ७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४८५ इतकी आहे.

राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुणे येथे सापडले असून त्यानंतर नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हे जिल्हे राज्यातच नाही तर देशातही पहिल्या दहा मध्ये येत आहेत.

राज्यातील परिस्थिती अशीच गँभीर राहिली तर संचारबंदी करण्याला पर्याय राहणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान सर्वानी प्रतिबंधात्मक उपाय पाळावेत आणि सामाजिक अलगावचे नियम काटेकोरपणे अंमलात आणावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group