हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील मुख्य शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान मागील 24 तासांमध्ये राज्यात 6 हजार 971 कोरोनाबाधित वाढले असुन, 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी , मास्क वापरा लॉकडाउन टाळा, शिस्त पाळा लॉकडाउन टाळा, असं आवाहन केलं. पुढच्या आठ दिवस राज्याची कोरोना परिस्थिती पाहून राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 21 लाख 884 वर पोहचली आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यभरात 2 हजार 417 जण करोनातून बरे झाले. तर, एकूण 19 लाख 94 हजार 947 रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या 52 हजार 956 असुन, आजपर्यंत 51 हजार 788 रुग्णांचा राज्यभरात करोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’