सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित हजारांच्या पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पहायला मिळत आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू वर्षातील नवा उंच्चाक कोरोनाबाधितांचा आलेला आहे. जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 100 जण कोरोनाबाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 76 हजार 400 आहे. तर जिल्ह्यात एकूण 64,566 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 8 हजार 706 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत.
कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. आज रात्रीपासून संचारबंदी सुरू होणार असल्याने सकाळपासून लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केलेली होती. काल रात्री झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या निर्दशानानुसार किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. तरीही लोकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केलेली पहायला मिळाली. या गर्दीपुढे सर्वच विभागातील प्रशासन हातबल होवून केवळ बघत होते. यांचा परिणाम म्हणजे कोरोना बाधितांची दिवसेंन दिवस संख्या वाढू लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा