पुण्यात आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध स्थरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. डॉ.  आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला खुद्द राज्यमंत्र्यांनीच हरताळ फासली आहे. पुणे येथे डॉ. आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली केली गेलेली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यात बुधवारी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त गर्दी न करता नियमांचे व आदेशाचे पालन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहे. मात्र, राज्यमंत्री कदम यांनी या आदेशाची पायमल्ली करीत चार लोकांना प्रवेश असतांनाही एकाच ठिकाणी केली गर्दी. यावेळी राज्यमंत्र्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळही उपस्थित होते.

आता राज्यमंत्र्यांनीच प्रवेश केल्याने त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांचा आदेश झुगारून प्रवेश केला. एकीकडे काही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता लहान कार्यक्रम घेत आहेत.

विश्वजीत कदम महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व मराठी भाषा या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Leave a Comment