सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढतच चालला असल्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढू लागली आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 7 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 84 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पॉझिटीव्ह रेट हा 33.33 टक्के इतका वाढला आहे. तो यापूर्वी 10.42 टक्के इतका होता. जिल्ह्यात गेल्या 12 तासात 21 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 7 रूग्ण बाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील विविध रूग्णालयात केवळ 22 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 18 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे.
मास्कसक्तीबाबत जिल्हाधिकारी काय म्हणाले पाहण्यासाठी येथे Click करा.
गेल्या 15 दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात राज्यात सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.