सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी अधिक होत आहे. आज बुधवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 15 बाधित आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही इतकी झाली आहे. शिवाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 8.15 टक्के झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ही 98 इतकी झाली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 16 रुग्ण उपचार घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या 12 तासात 184 रूग्णांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 15 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर आज 43 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे.
मार्च महिन्याच्या मध्यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. सध्या कोरोना बाधितांचा आकडा हा 100 पर्यंत पोहचला आहे.