राज्यात आणखी नवे ८२ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २ हजारा पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता ८२ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे ही दोन महानगर कोरोनाचे केंद्रबिंदू बनली आहेत. या दोन शहरात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर झाला असून दरोरोज नवे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कालपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९८२ पोहचला होता. दरम्यान, त्यात आणखी ८२ नवीन रुग्णांची भर पडली असूनही संख्या २ हजार ६४ इतकी झाली आहे.

तर दुसरीकडे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. शेवटच्या वृत्तानुसार देशात आतापर्यँत ९ हजार २५२ कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले असून ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

 

 

Leave a Comment