नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या घटनांमध्ये एकीकडे अनेक राज्यांत नाइट किंवा दिवसाचा कर्फ्यू लागलेला आहे. त्याचबरोबर सतत वाढत्या घटनांमध्ये मुंबई (Mumbai) मध्ये जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाखाली काही देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना (Passenger ) 14 दिवसांसाठी क्वारंटाईन (Quarantine) ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यापैकी यूके, युरोप, मिडिल ईस्ट, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी 7 दिवसांची इंस्टीट्यूशनल आणि 7 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवणे अनिवार्य असेल. तथापि, अशा व्यक्तीमध्ये ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, गर्भवती महिला, पाच वर्षांखालील मुलांना संस्थागत अलग ठेवणे आवश्यक नसते. याबाबत पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
फक्त यांनाच आराम मिळेल
बीएमसीने एक मार्गदर्शक सुचना जारी केली आहे ज्यामध्ये 65 वर्षे वयापेक्षा जास्त वयाची मुले, गर्भवती महिला आणि पाच वर्षाखालील मुले याशिवाय, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालक, गंभीर आजार असलेले प्रवासी किंवा तातडीने मेडिकल इमरजंसी परिस्थितीत असलेली लोकं वडील, आई, भाऊ, बहीण किंवा घरातील इतर सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त असतील किंवा एखाद्याचा मृत्यू झाला असेल. असे प्रवासी ज्यांनी कोविड 19 लसीचा डोस पूर्ण केला आहे. शस्त्रक्रिया किंवा इतर आवश्यक कामासाठी मेडिकल प्राेफेशनल्सकडे जावे लागते त्यांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाईनमधून सूट मिळेल.
विमानतळ अधिकारी परवानगी देतील
अशा सर्व प्रकरणांमध्ये, आवश्यक कागदपत्रे विमानतळांवर हजर असलेले ऑफिसर इन चार्जना दाखवावे लागतील. त्यानंतर आपल्याला सूट मिळेल की नाही याचा निर्णय ते घेतील. यानंतर क्वारंटाईन ठेवण्याच्या कालावधीत कठोर नियम पाळावे लागतील.
एका दिवसात सात मृत्यू
मुंबईत काेविड होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी कोरोना बळींची संख्या 3,58,896 वर पोहोचली, तर शनिवारी सात मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत येथे एकूण 11576 मृत्यू झाले आहेत. दररोज सरासरी 20,043 प्रकरणे समोर येत आहेत. शनिवारी त्यांची संख्या 27,126 होती.
रॅपिड एंटीजन टेस्ट अनिवार्य
बीएमसीने मुंबईतील गर्दी असलेल्या रस्त्यांवर मॉल्स, रेल्वे स्थानक, बस डेपो, खाऊ गल्ली, मार्केट, पर्यटन स्थळे आणि शासकीय कार्यालयांसह रॅपिड एंटीजन टेस्ट करणे सुरू केल्या आहेत. जर कोणी ही टेस्ट करण्यास नकार दिला तर त्याला साथीच्या कायद्यांतर्गत अटक केली जाऊ शकते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group