औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरुना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात दररोज 20 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. काही अतिशय तज्ञ शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सज्ज असून त्यासाठी सर्व उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत. मात्र, शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण चांगलेच वाढत आहेत. त्यामुळे तब्बल 61 गावात खडक लोक डाऊन लावण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या परिस्थितीने औरंगाबाद जिल्ह्यात ही चिंता व्यक्त केली जात आहे कारण जिल्ह्यातील अनेक नागरीकांचा अहमदनगर जिल्ह्याची दररोजचा संबंध येतो.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नगरचे अनेक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. कोरोना ची तिसरी लाट नगर जिल्ह्यातील रुग्णांच्या संपर्कातून जिल्ह्यात दाखल होऊ नये, यासाठी प्रशासन तेथील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी कायगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर या ठिकाणी तपासणी केंद्र उभे करण्यात येणार आहे.