कोरोना होऊ नये म्हणून तरुणाने केला भन्नाट जुगाड ; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Corona Treatment in Marathi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही वाढत जाणारी आकडेवारी पाहता लोकांच्या मनात त्याबद्दल अधिकच भीती निर्माण होत आहे. स्वतःला कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. सहा फुटांचं अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि गरम पाणी पिणे, तसेच वाफारा घेणे यामुळे कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं दावा केला जात आहे. Corona Treatment in Marathi

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुण भाजीवरील असलेल्या विषाणू आणि किटाणूंचा नाश करण्यासाठी कुकरच्या मदतीनं वाफ देत होता. त्यानंतर आता वाफ घेण्यासाठी तरुणानं अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

https://twitter.com/vineet10/status/1308752026096943104?s=20

काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता व्यक्तीनं वाफ घेण्यासाठी चक्क कुकरचा वापर केला आहे. कुकरच्या वॉलला त्यानं एक नळी लावून त्याद्वारे वाफ घेत असल्याचं दिसत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वाफ घेणं किती महत्त्वाचं आहे ते या तरुणाच्या जुगाडातून दिसत आहे. या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. Corona Treatment in Marathi

कुकरचा जुगाड करून वाफ घेणाऱ्या या तरुणाच्या व्हिडीओला 25 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 150 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. या तरुणानं केलेल्या जुगाडासाठी नोबेल पुरस्कार द्यावा असंही काही युझर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’