नवी दिल्ली । केंद्र सरकारने रशियाची फक्त एक डोस असलेली कोविड -19 विरोधी लस स्पुतनिक लाइटच्या भारतात निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, स्पुतनिक लाइट लस अद्याप भारतात वापरासाठी मंजूर झालेली नाही. Sputnik V म्हणाले की,” One shot Sputnik Light ही भारतातून निर्यात होणारी पहिली लस बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय औषध कंपनी हेटेरो बायोफार्मा लिमिटेडला Sputnik Light चे 40 लाख डोस निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हेटेरो बायोफार्मा भारतात स्पुतनिक लाइट तयार करते.
रशियाचे राजदूत निकोले कुडाशेव यांनी भारत सरकारला विनंती केली की,’जोपर्यंत लस भारतात वापरण्यासाठी ड्रग रेगुलेटरकडून मंजूरी मिळत नाही तोपर्यंत रशियाला स्पुतनिक लाइट निर्यात करण्याची परवानगी द्यावी.’ भारताच्या ड्रग रेगुलेटरने एप्रिलमध्ये Sputnik V च्या आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली, तेव्हापासून ती भारताच्या कोविडविरोधी लसीकरण कार्यक्रमात वापरली जात आहे.
चाचणी चालू आहे
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारतात Sputnik Light च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला मान्यता दिली आहे. कोरोना विषयक तज्ञ समितीने त्याच्या चाचणीला मंजुरी दिली आहे. समितीचे म्हणणे आहे की,”Sputnik Light मध्ये Sputnik V सारखेच कंपोनंट आहेत.”
एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की,” Sputnik Light ची अँटी-कोरोनाव्हायरस क्षमता 78 ते 83 टक्के आहे, जी कोणत्याही लसीच्या दोन डोसपेक्षा जास्त आहे.” भारतात सध्या फक्त दोन डोसची कोरोना लस दिली जात आहे. Sputnik V लसीचे दोन डोस देखील दिले आहेत तर Sputnik Light ही सिंगल डोसची लस आहे.